राज्यपालांचे वक्तव्य : उदयनराजेंनी टोचल्यामुळे आधी पवार बोलले, त्यामुळे उद्धवजींना बोलावे लागले; फडणवीसांचे टोले


प्रतिनिधी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातले आदर्श म्हटले, तर शरद पवार आणि नितीन गडकरींना नव्या काळातले आदर्श म्हटले. मात्र या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राज्यपालांविरुद्ध जोरदार गदारोळ उठला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांचे वाभाडे काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. Devendra Fadanavis targets sharad Pawar and Uddhav Thackeray over the statements by governor Bhagat Singh koshiyari

पण त्याच वेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांना खोचक शब्दात सुनावले आहे. शरद पवार व्यासपीठावर असताना राज्यपालांनी छत्रपतींविषयी गैरउद्गार काढले, त्याचवेळी पवारांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध का नाही केला?, असा बोचरा सवाल उदयनराजे यांनी केला.

उदयनराजेंच्या खोचक सवालानंतर आज दुपारी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांना बोलताना तारतम्य राहत नसेल, तर अशा व्यक्तींना राज्यपाल पदी नेमू नये. याचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी घ्यावा, असे वक्तव्य केले. त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांचा निषेध केला. राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र व्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली.

या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी वर उल्लेख केलेला घटनाक्रमच म्हणजे क्रोनोलॉजी विशद केली. उदयनराजे यांनी शरद पवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पवार साहेब पत्रकार परिषद घेऊन बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलावे लागले, असा टोला फडणवीस यांनी हाणला आणि ते निघून गेले.

तत्पूर्वी, महाराष्ट्रातून एकही गाव कर्नाटकात जाणार नाही या मुद्द्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी फडणवीसांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. तो देखील फडणवीस यांनी फेटाळला. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राने जी ठाम भूमिका घेतली आहे, तीच भूमिका मी मांडली. मी चिथावणीखोर वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले.

Devendra Fadanavis targets sharad Pawar and Uddhav Thackeray over the statements by governor Bhagat Singh koshiyari

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात