अंबरनाथ तालुक्यात महिलेची टेम्पोमध्ये प्रसूती, बाळ दगावलं; आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव : मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना


विशेष प्रतिनिधी

अंबरनाथ : एका महिलेची प्रसूती टेम्पोमध्ये झाल्याने यात नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात घडली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील म्हात्रे पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वंदना वाघे यांच्या बाबतींत ही घटना घडली आहे. Delivery of a woman in tempo in Ambernath talukaवंदना यांना मध्यरात्री प्रसूतीसाठी मांगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन जाण्यात आले.मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने वंदना यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा, असे तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटूंबियांना सांगितले. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जात असताना मध्येच टेम्पोत त्यांची प्रसूती झाली. यात त्यांचे बाळ दगावले.

मांगरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सुविधा नाहीत परिणामी अत्यावश्यक वेळी येथे रुग्णांवर उपचार न करता पुढे पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नक्की उपयोग काय ? असा सवाल रहिवासी करत आहेत. गेल्या वर्षभरात अशाच तीन घटना घडल्या असून त्यातही नवजात बाळ दगावले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.आता तरी आरोग्य यंत्रणेला जाग येणार का असा प्रश्न नागरिक करत आहे.

  • अंबरनाथ तालुक्यात महिलेची टेम्पोमध्ये प्रसूती
  • मलंगगड आदिवासी पाड्यातील महिलेवर प्रसंग
  • मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाही
  • उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेताना प्रसूती
  • गेल्या वर्षभरात ३ नवजात बाळ दगावली
  • आता तरी आरोग्य यंत्रणेला जाग येणार का ?

Delivery of a woman in tempo in Ambernath taluka

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण