गोपीनाथगड (पांगरी) तालुका परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत.Dedication at the hands of Dhananjay Munde at e-Ustod Kalyan App Beed
विशेष प्रतिनिधी
बीड : बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची डिजिटल पद्धतीने नोंदणी करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ई-ऊसतोड कल्याण‘ या ॲपचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते.परंतु मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली .दरम्यान अतिवृष्टीने ओढवलेल्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत त्यामुळे नोंदणी प्रक्रिया मंदावली आहे.
त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
‘ई-ऊसतोड कल्याण‘ हे ॲप प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यातील कामगारांची नोंदणी कमीत कमी वेळेत करण्यासाठी तयार करण्यात आले असून यानंतर सबंध राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी दिली.
गोपीनाथगड (पांगरी) तालुका परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत. त्यांच्यासह सूर्यभान मोरे, शिवाजी लाटे, शिवाजी गोपाळा आंधळे, राजाराम बापूराव आंधळे, आसाराम बापुराव आंधळे, आश्रोबा गोपाळा आंधळे, भाऊराव संतराम आंधळे, अंकुश श्रीहरी सारुक, लक्ष्मण भगवान आंधळे आदी कामगारांना श्री.मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्र देण्यात आले.
ऊसतोड कामगारांना लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App