काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूर हिंसाचारावरून वळले सीतापूरकडे!!


वृत्तसंस्था

सीतापूर : उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत लखीमपूर खीरी हिंसाचारावर लागलेले लक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरकडे वळविले आहे. कारण सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध करून ठेवले आहे. Congress workers turn their attention from Lakhimpur violence to Sitapur !!

प्रियंका गांधी या काल लखीमपूरकडे रवाना होत असताना त्यांना पोलिसांनी सीतापूर मध्ये डाक बंगल्यात ठेवले आहे. काल दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात विविध ठिकाणी लखीमपूरच्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ निदर्शने केली. परंतु आज सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूरवरून वळून सीतापूरकडे लागले आहे.

काल रात्री पासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज कार्यकर्त्यांची तिथे जोरदार गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशातून विविध शहरे आणि गावांमधून काँग्रेस कार्यकर्ते सीतापूरकडे वळले आहेत. प्रियांका गांधी यांना सोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सीतापूरमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स तोडली आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्या. याचा अर्थच असा की काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूर हिंसाचाराकडे असण्यापेक्षा आपल्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या सुटकेकडे अधिक लागले आहेत.

Congress workers turn their attention from Lakhimpur violence to Sitapur !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात