मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात मृत्युदरदेखील वाढला असून त्यात आणखी वाढ होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. Death rate incresed in Mumbai

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांत दगावणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. एप्रिल २०२० मध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांत दगावणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के होते. जानेवारीत ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आले. एप्रिलमध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन हे प्रमाण आता २० टक्क्यांवर गेले आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील मृत्युदर ०.२ टक्के होता. एप्रिलच्या सुरुवातीला मृत्युदर केवळ ०.३५ टक्क्यांवर होता. तो आता ०.८७ टक्क्यांवर गेला आहे. पुढील आठ ते १० दिवसांत त्यात आणखी वाढ होऊन तो एक टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील १० ते १२ दिवस मृत्युदरात वाढ झाल्यानंतर तो कमी होत जाईल, असे तज्ञांनी सांगितले.

Death rate incresed in Mumbai

महत्वाच्या बातम्या