Cyclone Taukate Live Updates : दक्षिण पूर्व आणि लगतच्या मध्य अरबी समुद्रात कमी दबावाच्या क्षेत्रामुळे तौकते चक्रीवादळ तयार झाले. हे वादळ वेगाने पुढे सरकत असून रविवारी संध्याकाळी मुंबई किनारपट्टीजवळून गुजरातकडे सरकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित भागांत वेगवान वाऱ्यांसह मूसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. Cyclone Taukate Live Updates, Taukte Will Hit Mumbai Sea Shore at 5PM, See Latest Updates
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण पूर्व आणि लगतच्या मध्य अरबी समुद्रात कमी दबावाच्या क्षेत्रामुळे तौकते चक्रीवादळ तयार झाले. हे वादळ वेगाने पुढे सरकत असून रविवारी संध्याकाळी मुंबई किनारपट्टीजवळून गुजरातकडे सरकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित भागांत वेगवान वाऱ्यांसह मूसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपले आहे.
चक्रीवादळामुळे सध्या केरल, गोवा, मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ हळूहळू गुजरातची किनारपट्टी और केंद्र शासित प्रदेश दादरा-नगर हवेलीच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. मुंबईत आज दुपारपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह गोव्यात बहुतांश पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग जवळजवळ ताशी 60 ते 70 किमी प्रति तास असेल.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता हे चक्रीवादळ अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य दिशेला होता. येथून पुढे सरकताना हे भयंकर चक्रीवादळात रूपांतरित झाले. 18 मे रोजी दुपारी ते गुजरातमधील पोरबंदरहून ते पाकिस्तानच्या दिशेने जाईल. या काळात पोरबंदर आणि नलिया किनारपट्टीवर विध्वंसाची शक्यता आहे. या काळात केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि पश्चिम राजस्थानात मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर ताशी 85 ते 95 किमी वेगाने वारे वाहतील. दरम्यान, 16 मे रोजी सकाळी किनारी प्रदेशात वाऱ्याचा वेग ताशी ताशी 130 ते 145 किमीपर्यंत वाढेल. महाराष्ट्रातील पालघरमध्ये अद्याप 97 बोटी परत आलेल्या नाहीत. ठाणे व पालघर प्रशासनाने लोकांना घरे न सोडण्याचे तसेच समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी एनडीआरएफने चक्रीवादळ तौकतेचा सामना करण्यासाठी पथकांची संख्या 53 वरून 100 पर्यंत वाढवली. त्यापैकी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात 42 पथके तैनात करण्यात आली असून 26 पथके स्टँडबायवर ठेवली आहेत. त्याशिवाय 32 पथके बॅकअप म्हणून ठेवण्यात आली आहेत. गरजेनुसार त्यांनाही मदत-बचाव कार्यात उतरवले जाईल. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ट्विट केले की, या संघातील सर्व सदस्यांना कोरोनाची लस मिळालेली आहे. भुवनेश्वर येथूनही ही पथके गुजरातकडे रवाना झाली असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 18 मे रोजी दुपारी गुजरातमध्ये वादळाचा तडाखा बसू शकतो.
त्याचवेळी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सर्व आवश्यक दक्षता घेण्यास सांगितले आहे.
Cyclone Taukate Live Updates, Taukte Will Hit Mumbai Sea Shore at 5PM, See Latest Updates
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App