विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक जर माणसाला कळाला तर माणसाचेच नाही तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जीव जनावरांचे देखील आयुष्य सुरक्षित होईल. कालच कोल्हापूरमध्ये एका लहानग्याला अंधश्रद्धेपोटी आपला जीव गमवावा लागला होता. इथे माणूस माणसाला मारण्यासाठी घाबरत नाहीये तर मुक्या जनावरांची कोणाकडे न्याय मागावा?
Culmination of a distorted mentality was seen in takala area kolhapur
कोल्हापूरमधील टाकाळा परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर ऍसिड टाकून भाजण्याचा प्रकार काल कोल्हापुरात घडला आहे. तर मांजराच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलांना गटारीत फेकण्यात आले होते. या घटनेची दखल प्राणीप्रेमी संस्थेने घेतली आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात या विकृत कृत्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
कोल्हापुरात नरबळीचा संशय, कापशीत ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह हळदी-कुंकू लावल्याच्या अवस्थेत घराच्या पाठीमागे आढळला
ऍसिड फेकण्यात आलेल्या कुत्र्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पण पाठीवर आणि पोटावर ऍसिड ओतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. बल्ब आणि फुग्यामध्ये ऍसिड भरून, फेकून ही इजा केली असावी असा संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App