कोल्हापुरात नरबळीचा संशय, कापशीत ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह हळदी-कुंकू लावल्याच्या अवस्थेत घराच्या पाठीमागे आढळला


वृत्तसंस्था

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळी ? दिल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कापशीत एक सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली असून हा प्रकार नरबळीचा असल्याच्या संशयाने घबराट उडाली आहे.
Male casualties in Kolhapur district? ; Body of 7-year-old boy found in kapshi

आरव केशव केशरे (वय ७), असे त्या मुलाचे नाव आहे. त्याचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्यानंतर त्याचा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याचे आज पहाटे ६ वाजता उघड झाले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता पंचक्रोशीत पसरण्याबरोबरच जिल्ह्यात हा हा म्हणता पसरली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासन हादरले आहे.
अंनिसकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

Male casualties in Kolhapur district? ; Body of 7-year-old boy found in kapshi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण