Coronavirus Vaccine : पुण्यात लस आली पण, लसीकरण होईना ! ज्येष्ठांना ८४ दिवसांच्या नियमाचा फटका


वृत्तसंस्था

पुणे : दात आहेत पण, चणे नाहीत, अशीच काहीशी परिस्थिती शहरातील नागरिकांची बुधवारी झाली. कोरोनाविरोधी लस आली. पण ती नव्या नियमांमुळे घेता मात्र आली नसल्याची घटना पुण्यात घडली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागले.

दोन दिवसांचा ब्रेकनंतर पुण्यात बुधवारी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र ८४ दिवसांच्या नियमामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे लसीकरण नेमके कोणासाठी असा प्रश्न आता विचारला जात आहे. हा प्रश्न लक्षात घेतला असून नियोजन करू, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

लस संपल्याने कोव्हीशील्डचे लसीकरण ४ दिवस तर संपूर्ण लसीकरण दोन दिवस बंद होते. मंगळवारी अखेर राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला कोव्हीशिल्डच्या लसी प्राप्त झाल्या. फक्त ७५०० डोस देण्यात आले आहेत. महापालिकेने फक्त दुसऱ्या डोस साठीच केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डोस साठी नोंदणी केलेले लोक तसेच वॉक इन लसीकरण केलं जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.



मात्र नव्या नियमानुसार दोन डोसमध्ये आता ८४ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण १ मार्चला सुरू झाले. १ तारखेला पहिला डोस घेतलेल्यांचा दुसऱ्या डोसची तारीख आता २४ मे रोजी येत आहे. त्यामुळे अनेक जणांना लसीकरण केंद्रांवरून माघारी जावे लागले.

नवीन नियमानुसार कोणताच नागरिक लसीकरणासाठी पात्र होत ठरत नाही. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना परत पाठवले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे लस शिल्लक राहिली आहे.
– रणजित शिरोळे, मनसे नेते

आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करपैकी अनेकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांचे लसीकरण करण्यात येईल.याशिवाय जो इतर नागरिकांचा प्रश्न आहे त्या बाबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात