उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आठवडाभरात कोरोनाच्या अडीच लाख चाचण्या


वृत्तसंस्था

मुंबई – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असून खबरदारी म्हणून मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईत आठवडाभरात ८५ हजारांहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या. आठवडाभरात अडीच लाख चाचण्या केल्या गेल्या.Corona tests increased in Mumbai

पालिकेने मुंबईत शुक्रवारी ४०,४४३ कोविड चाचण्या केल्या. शनिवारी ४४,६४९ चाचण्या केल्या. दोन दिवसांत ८५ हजार चाचण्या करण्यात आल्या. गेल्या आठवडाभरात २,३४,७५७ चाचण्या झाल्या. त्यापैकी २८२७ जण कोविड बाधित सापडले. बाधित होण्याचा दर १.२० टक्के नोंदवण्यात आला.कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन चाचण्यांची संख्याही कमी झाली होती. दैनंदिन ५० हजारांवरील चाचण्यांचा आकडा २५ हजारांच्या आत आला होता. मात्र, सध्या उत्सवाचे वातावरण असल्याने पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत असून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

Corona tests increased in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण