पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात कोरोनाचा संसर्ग ; प्रशासन निर्बंध शिथील करणार का ?


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत आहे. परंतु, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सहा जिल्ह्यात ही चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सोमवारी निर्बंधाबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Corona in western Maharashtra, Konkan including Pune Infection Will the administration relax the restrictions?

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनकच आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.



कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या कमी झाली असली तरी परिस्थिती चिंताजनक म्हणावी लागेल.

त्यामुळे येत्या सोमवारपासून (१४ जून) अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलणार आहे आणि त्यानुसार निर्बंध लागू केले जाणार आहेत. मात्र राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकण विभागातील या तीन जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावा लागणार आहे.

कुठल्या विभागात किती रुग्ण ?

ठाणे मंडळ – 2267

नाशिक मंडळ – 978

पुणे मंडळ – 2760

कोल्हापूर मंडळ – 3503

औरंगाबाद मंडळ – 224

लातूर मंडळ – 361

अकोला मंडळ – 387

नागपूर मंडळ – 217

एकूण – 10,697

Corona in western Maharashtra, Konkan including Pune Infection Will the administration relax the restrictions?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात