सावधान ! कोरोनाचा विषाणू हवेतूनही पसरतोय ; रुग्णसंख्या वाढणाऱ्या मुंबई, पुण्यासाठी धोक्याची घंटा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एखाद्याला कोरोना झाला, असे म्हंटले अन्य जणांना भीती वाटायला लागते. कोरोना विषाणू रूप बदलत असून आता त्याचा संसर्ग हवेतून होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. या वृत्तामुळे रुग्णसंख्या वाढणाऱ्या मुंबई आणि पुण्यात आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे. Be careful! The corona virus also spreads through the air



लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हंटले आहे की, कोरोना अर्थात  SARS-CoV-2 व्हायरस हा हवेतून पसरत आहे. त्याचे आता पुरावे मिळत आहेत.

ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितलंय की कोरोना हवेतून पसरत आहे. त्यामुळे जगभरात त्यावर नियंत्रण ठेवता आलेले नाही. कोरोनाचा प्रसार हा हवेतून होतो, या दाव्यासाठी दहा ओळींचे पुरावे दिले आहेत.

Why Corona Spreads Through the Air ?, Read the Top 10 Top Points From The Lancet Report

घरातील वातावरण बंदिस्त नको

बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील बंदिस्त वातावरणात कोरोनाचा प्रसार जास्त होतो. पणयोग्य वेन्टिलेशन व्यवस्था असेल तर धोका कमी आहे.

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात, 32 देशांच्या 200 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहलं होतं. त्यामध्ये म्हंटले होते की, कोरोनाचा प्रसार हा हवेतून होतो. डोळ्याला न दिसणाऱ्या कणांमुळे लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होतो आहे.

Be careful! The corona virus also spreads through the air

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात