वृत्तसंस्था
मुंबई : महापराक्रमी ‘वैजयंता’ रणगाड्याची अवहेलना होत असून ७१ च्या युद्धतील ऐतिहासिक ठेवा हा कळव्याच्या रेतीबंदर जवळच्या कचऱ्यात उभा आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहेContempt for the mighty ‘Vaijayanta’ tank; Standing in the trash traces of the war of 1971
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविणारा ‘वैजंयता’ रणगाडा हुतात्मा मेजर मनीष पितांबर यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्टेशन जवळ बसविला होता. मात्र, आज तोच रणगाडा कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवला आहे. रंगरंगोटीसाठी काढलेला रणगाडा आजपर्यंत पुन्हा जुन्या बसविलेला नाही.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने बसविलेल्या या रणगाड्याची आज दुर्दशा झाली आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘वैजयंता’ रणगाडा हुतात्मा मनीष पितांबरे यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दिला होता.
मुंब्रा स्टेशनजवळ मोकळ्या जागेत हा रणगाडा १९ मे, २०१३ रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करून बसवला होता.मुंब्रा स्टेशन परिसरातून १६ ऑगस्ट २०१९ रोजी रणगाड हटविला.
तो पुन्हा रंगरंगोटी करून मुंब्रा स्टेशन परिसरात चबुतऱ्याच्या पायऱ्या तोडून काचेत बसविण्यात येणार होता. मात्र दोन वर्ष उलटली तरी त्याकडे कोणाचे लक्ष नाही. सध्या हा रणगाडा रेतीबंदर येथील मोकळ्या भूखंडात ठेवला आहे, तो धूळखात पडला आहे. सुर्याचं प्रतीक असलेला वैजयंता रणगाडा पुन्हा मुंब्रा स्टेशन परिसरात बसणार कधी? असा सवाल मुंब्रावासी विचारीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App