प्रतिनिधी
मुंबई : ”राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मला अटक करण्याची तयारी केली आहे. माझ्या घराबाहेर पोलिसांचा गराडा पडला आहे,” असा खलबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. Conspiracy of my arrest from Thackeray- Pawar government, allegation of Kirit Somaiya; Trying to diturb Kolhapur tour?
किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारची गुंडगिरी, पोलिस दमनशाही सुरु आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी झाली आहे. याबाबतची एक व्हिडिओ क्लिप त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात हे सर्व आरोप त्यांनी केले आहेत. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी ठाकरे सरकारने कंबर कसली आहे. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळा अधिक उघड करण्यासाठी मी कोल्हापूरला आज जाणार आहे. पण ,तो घोटाळा दाबण्यासाठी मला माझ्या मुलुंडच्या घरातून अटक करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिले आहेत,असा आरोप त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, मी मुलुंड निलम नगर येथून आज सायंकाळी ५.३० वाजता घराबाहेर पडणार आहे. प्रथम गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन करणार आहे. आणि त्यानंतर ७.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना होत आहे. पण, या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न आघाडी सरकारकडून होत असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App