दुर्दैवी घटनेतही राजकारण : सचिन सावंतांनी नाशिकच्या घटनेसाठी भाजपला ठरवले जबाबदार, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Congress Leader Sachin Sawant held BJP responsible for Nashik Oxygen Leak incident

Nashik Oxygen Leak : राज्यात कोरोना महामारीने सर्वसामान्यांना जेरीस आणलेले आहे. अनेकांचा बेड, ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे आढळून येत आहे. बुधवारी नाशिकमधील झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने तब्बल अर्धातास ऑक्सिजनचा पुरवठा बंद होता. या काळात 22 रुग्णांचा तडफडून अंत झाला. या दुर्दैवी घटनेनंतर भाजपने घटनेच्या सखोल चौकशी मागणी केलेली असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र या घटनेसाठी भाजपलाच जबाबदार ठरवले आहे. Congress Leader Sachin Sawant held BJP responsible for Nashik Oxygen Leak incident


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोना महामारीने सर्वसामान्यांना जेरीस आणलेले आहे. अनेकांचा बेड, ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे आढळून येत आहे. बुधवारी नाशिकमधील झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने तब्बल अर्धातास ऑक्सिजनचा पुरवठा बंद होता. या काळात 22 रुग्णांचा तडफडून अंत झाला. या दुर्दैवी घटनेनंतर भाजपने घटनेच्या सखोल चौकशी मागणी केलेली असतानाच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र या घटनेसाठी भाजपलाच जबाबदार ठरवले आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?

नाशिकच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत म्हणाले की, ऑक्सिजनच्या गळतीमुळे नाशिकमध्ये रुग्णांचा दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेसाठी भाजपच आहे. त्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारावी. भाजपचे महापौर आणि 3 स्थानिक आमदार फरार झाले आहेत का? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

काय म्हणाले प्रवीण दरेकर…

दुसरीकडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस…

याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे. नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी केली आहे.

राजेश टोपे आधी म्हणाले, किरकोळ घटना…

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीवर एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, ऑक्सिजन गळती लगेच थांबवल्यामुळे ऑक्सिजन फार वाया गेला नाही ही “मायनर” अर्थात किरकोळ घटना आहे.

अर्धा तास बंद राहिला ऑक्सिजनचा पुरवठा

टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 22 रुग्ण तडफडून दगावले. लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाल्यानंतर पुरवठा बंद करण्यात आला होता, अशी माहिती मिळत आहे. यामुळे त्याचा थेट परिणाम व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांवर झाला. आणि 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर सातत्याने आरोप सुरू आहेत. त्यातच नाशिक मधील या रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे रुग्णांचा जीव गेला. या घटनेची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

Congress Leader Sachin Sawant held BJP responsible for Nashik Oxygen Leak incident

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात