सत्तेसाठी आघाडी, सत्ता गेल्यावर बिघाडी!!; काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत!!; पण काँग्रेस उपद्रव मूल्य दाखवेल??


विनायक ढेरे

नाशिक : “सत्तेसाठी आघाडी आणि सत्ता गेल्यावर बिघाडी” याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार गेले आणि तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशांना झाली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची प्रचिती दिली आहे. Congress is opting out of MVA, but will it show political nuisance value to NCP and Shivsena

विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा अधिकार होता. परंतु, त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आम्हाला विचारले देखील नाही. परस्पर विधान परिषद उपसभापतींना पत्र देऊन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर फडणवीस – पवार हे पहाटेचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींकडे गेले होते. त्यामुळेच काँग्रेस महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकार मध्ये सामील झाली होती. शिवसेनेबरोबर आमची नैसर्गिक आघाडी नव्हतीच, अशी कबुली नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीत राहणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे.


Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!


महाराष्ट्राची एकूण राजकीय व्यूहरचना पाहता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच त्यातल्या त्यात एकत्र काम करू शकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेस पक्ष त्या अर्थाने कधीच मानसिक दृष्ट्या शिवसेना आणि शरद पवार यांच्याबरोबर जुळवून घेण्याच्या स्थितीत नव्हताच. केंद्रीय पातळीवर निर्णय झाल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांना मंत्रिपदे मिळणार असल्याने सत्तेतला जो काही वाटा मिळेल तो घ्यावा या हेतूने काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीमध्ये जाऊन जुळले होते. याची कबुली नाना पटोले यांच्या तोंडून आली आहे.

काँग्रेसचे उपद्रवमूल्य उरले नाही

पण नाना पटोले आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांचे महाराष्ट्रातले राजकीय उपद्रवमूल्य एवढे उरलेले नाही, की थे उद्धव ठाकरे अथवा शरद पवार यांना कोणता राजकीय धडा शिकवू शकतील!! त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आपल्या अत्यंत दुबळ्या राजकीय अवस्थेत देखील केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या जोरावर राजकीय लाभ उठवत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडून घेतले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे आहेत हा यातला महत्त्वाचा घटक आहे. त्यांनीच अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाला मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री – विरोधी पक्षनेते दोन्ही शिवसेनेचे

एकीकडे शिवसेनेचाच शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते अशी वेगळी राजकीय चमत्कारिक परिस्थिती ठाकरे – पवारांनी आणून दाखवली आहे आणि त्याचीच नेमकी राजकीय सल काँग्रेसच्या नाना पटोले यांना टोचली आहे!!

राष्ट्रवादीचा कावा

शिवसेनेचे विरोधी पक्ष नेतेपद त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा ही देखील वरवरची बाब नाही. विधान परिषदेच्या सभापतीपदी पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा आहे. निदान शिवसेना, शिंदे गट, भाजप यांच्याशी यासाठी तरी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिंदे गट भाजप पण एक वेळ राष्ट्रवादीशी सभापती पदाच्या निवडणुकीपुरते जुळवून घेतील पण काँग्रेसशी अजिबात नाही, ही पक्की माहिती पवारांना आहे. त्यामुळे याबाबतीत काँग्रेसला झटकले तरी काही हरकत नाही, असा पवारांचा होरा असावा. अर्थात पवारांचे हे राजकारण यशस्वी होईलच, असेही नाही. शिंदे गट आणि विशेषतः भाजपा यामध्ये स्वतःची वेगळी खेळी खेळू शकतो.

 महाविकास आघाडी कागदावर

काँग्रेस आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची केवळ औपचारिक घोषणा करण्याच्या स्थितीत येऊन पोहोचली आहे. पण तशीही महाविकास आघाडी नावाचा राजकीय घटक सध्या तरी कागदावरच उरला आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची राजकीय तोंडे वेगवेगळ्या दिशेला आधीच पाहताना दिसत आहेत. अशावेळी नानांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेनेच्या ठाकरे गटावर चिडचिड करून मूळातच राजकीय उशीर केला आहे.

 काँग्रेस उपद्रव मूल्य दाखवेल?

विधान परिषदेच्या सभापती निवडीच्या वेळी नाना आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी जर आपले चातुर्य दाखवून शरद पवारांच्या उमेदवाराला “राजकीय फाऊल” केला, तर काँग्रेसने आपले उपद्रव मूल्य दाखवून दिल्याचे मानता येईल. अन्यथा नानांची ही नेहमीप्रमाणे बडबड ठरेल!! बाकी काही नाही!!

Congress is opting out of MVA, but will it show political nuisance value to NCP and Shivsena

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात