राज्यसभा निवडणूक : ओवैसींची ऑफर काँग्रेसने स्वीकारली; शिवसेनेची कोंडी!!


प्रतिनिधी

मुंबई : एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पण त्यामुळे शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. Congress accepts Owaisi’s offer; Shiv Sena’s dilemma

राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवैसी यांनी जाहीर केली.



पटोले काय म्हणाले?

ओवैसी यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय समाजवादी पक्षही आमच्यासोबत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

पटोले म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांना प्रशिक्षणाची काहीच गरज नाही. फक्त मतदानाची थोडी पद्धत सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचे दोन दिवसाचे अधिवेशन झाले. त्याचा 100 दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. काँग्रेस विचारधारेची चळवळ महाराष्ट्रात उभी करायची आहे. त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्व आमदार हे पटोलेंच्या निवासस्थानी थांबणार असल्याचे समजते.

Congress accepts Owaisi’s offer; Shiv Sena’s dilemma

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात