पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली; चिनी प्रतिस्पर्ध्यावर मात!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकवीर पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत मोलाची कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी अंतिम सामन्यात सिंधूने चीनच्या वँग झीयी हिचा दारुण पराभव करत, विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूने आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं आहे. तसेच या मोसमातील सिंधूचे हे तिसरे विजेतेपद आहे.  congratulate pvsindhu1 on winning her first ever Singapore Open title

चुरशीचा सामना 

ऑलिम्पिक 2021 मध्ये कांस्यपदक मिळवत देशाची मान उंचावणा-या सिंधूने पुन्हा एकदा दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. सिंगापूर बॅडमिंटन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूची झुंज ही चीनच्या वँग झी यी हिच्यासोबत होती. अत्यंत चुरशीची अशी ही लढत तब्बल 57 मिनिटे चालली.

सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करायला सुरुवात करत पहिल्या डावात 21-9 असा सहज विजय मिळवला. मात्र दुस-या डावात वँगने कडवा प्रतिकार करत सिंधूचा भेदक मारा रोखण्याचा प्रयत्न केला. दुसरा डाव वँगने 21-11 असा जिंकत सामन्यात सिंधूसोबत 1-1 ची बरोबरी केली.

मोदींनी केले कौतुक

निर्णायक अशा तिसऱ्या डावात सिंधू आणि वँग यांनी जशास तसे उत्तर देत हा डाव चुरशीचा केला. तरीही सिंधूने हा डाव 21-15 असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. सिंधूच्या या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे. तिचे हे विजेतेपद आगामी पिढीला प्रेरणादायी आहे, असे सांगत मोदींनी सिंधूचे कौतुक केले आहे.

congratulate pvsindhu1 on winning her first ever Singapore Open title

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात