देर आये दुरुस्त आये! संपले एकदाचे वर्क फ्रॉम होम ; देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ ठाकरेही कोकण दौऱ्यावर ; टीकेची झोड उठल्यावर मुख्यमंत्र्याना उपरती

  • कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच करोनाचे संकट आणि तरीही  मुख्यमंत्री घरात बसले.

  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते.Come late come right! Once the work from home is over … After Devendra Fadnavis, After the criticism CM Thackeray is also on a Konkan tour

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. कोकणात फार नुकसान झालं आहे. याच नुकसाणीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून कोकण दौर्यावर आहेत.फडणवीस कोरोना काळात ग्रांऊड लेव्हलवर अहोरात्र झटत असल्याचे सर्वांनी पाहिले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात एकदाही घराबाहेर पडले नाहीत .चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर आता फडणवीसांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.राज्यात निर्माण झालेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणारं तोक्ते वादळाचं संकट या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र फक्त फेसबुक लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमांतून परिस्थितिचा आढावा घेत असल्याने जन सामान्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .यामुळे आता मुख्यमंत्री कोकणात जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडवीसांचा कोकण दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौर्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) रायगड, उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत.

Come late come right! Once the work from home is over … After Devendra Fadnavis, After the criticism CM Thackeray is also on a Konkan tour