मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा : पूरग्रस्त महिलेचा टाहो अन् भास्कर जाधवांनी हात उगारल्याचे व्हिडिओ व्हायरल, ठाकरे सरकारवर पूरपर्यटनाची चौफेर टीका

CM Uddhav Thackeray visit flood affected Chiplun Maharashtra Women Crying In Front Of CM Thackeray Watch Video

 Women Crying In Front Of CM Thackeray : “तुमच्या दुकानातल्या वस्तू खराब झाल्याची चिंता करू नका. तुम्हाला काहीही झाले नाही हे सुदैव. तुम्ही सुरक्षित आहात ना? तुमच्या वस्तूंच्या नुकसानीचे काय करायचं आहे ते आमच्यावर सोडा,” हे उद्गार आहेत चिपळूण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आज (रविवार, 25 जुलै) दुपारी 1 वाजता चिपळूणमध्ये पोहोचले होते. यावेळी एका पूरग्रस्त महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर फोडलेल्या टाहोचा व्हिडिओही सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.  CM Uddhav Thackeray visit flood affected Chiplun Maharashtra Women Crying In Front Of CM Thackeray Watch Video


विशेष प्रतिनिधी

चिपळूण : “तुमच्या दुकानातल्या वस्तू खराब झाल्याची चिंता करू नका. तुम्हाला काहीही झाले नाही हे सुदैव. तुम्ही सुरक्षित आहात ना? तुमच्या वस्तूंच्या नुकसानीचे काय करायचं आहे ते आमच्यावर सोडा,” हे उद्गार आहेत चिपळूण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आज (रविवार, 25 जुलै) दुपारी 1 वाजता चिपळूणमध्ये पोहोचले होते. यावेळी एका पूरग्रस्त महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर फोडलेल्या टाहोचा व्हिडिओही सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

महिलेचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो

गुरुवारपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला आहे. रविवारी पूर थांबला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी चिपळूण गाठताच तेथे प्रचंड गर्दी जमली. पुरामुळे मोडून पडलेल्या लोकांनी ढसढसा रडत आपल्या व्यथा- वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यादरम्यान मुख्यमंत्र्यांना पाहून एक महिला दुकानदार जोरात रडत तिचं दु:ख सांगू लागली होती. ती महिला म्हणाली की, साहेब, आम्हाला आश्वासन नको आहे, आम्हाला मदतीची गरज आहे, पाणी आमच्या दुकानाच्या छतापर्यंत गेलं होतं… आमच्याकडे जे होते, नव्हतं सर्व काही संपलं आहे… तुम्ही आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका… आम्हाला सोडू नका… काहीही करू नका, आमदार-खासदारांचे पगार दोन महिने थांबवा, पण आम्हाला मदत करा साहेब!’एवढं म्हणून ती महिला ढसढसा रडत होती, यावर मुख्यमंत्री हात जोडून तिच्याकडे पाहतच राहिले.. त्यांना तिला दोन शब्द बोलायचेही सुचले नाही.

https://twitter.com/chetan4mns/status/1419250817844928513?s=20

महिलेच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधव यांच्या तेथील हावभावांचीही चर्चा सुरू आहे. पूरग्रस्त महिलेच्या टाहोवर त्यांनी सहानुभूती दाखवणे आवश्यक होते, परंतु त्यांनी हात उगारल्याचे दिसून आले. यामुळेही ठाकरे सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत का? असा सवाल आता विचारला जातोय.

‘तुम्ही आमचे पालक, शेतकऱ्यांसारखे कर्ज माफ करा’

मुख्यमंत्री चिपळूणच्या बाजारपेठेत पायी चालत असताना एका व्यापाऱ्याने आपली कैफियत मांडली, ‘साहेब, आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, आमचे सर्व सामान नष्ट झाले आहे.. आमच्यावर कर्ज आहे… साहेब तुम्ही आमचे पालक आहात.. जशी कर्जमाफी पीक निकामी झाल्यास शेतकऱ्यांना दिली जाते, त्याच प्रकारे आमची कर्जे माफ करा साहेब… आणि पुन्हा उभे राहण्यासाठी दोन टक्के दराने कर्ज द्या… आम्ही पुन्हा तुम्हाला कधीही भीक मागणार नाही..’

या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्र्यांना देता आले नाही. फक्त मान डोलवू शकत होते. स्थानिक लोक व व्यापाऱ्यांचे टाहो एवढे भीषण होते की मुख्यमंत्र्यांना काय बोलावं तेच कळत नव्हतं. आता त्यांना कृतीने काहीतरी करावे लागेल, हेही त्यांना समजले. परंतु ते उपस्थितांना एवढे मात्र नक्कीच म्हणाले की, आपण आपल्या नुकसानीची चिंता करू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभे करणे ही सरकारची जबाबदारी आहे!

वेदना आणि टाहो पाहून मुख्यमंत्री ठाकरे झाले निशब्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आज (रविवार, 25 जुलै) दुपारी 1 वाजता चिपळूणमध्ये पोहोचले होते. येथे जाऊन त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री चिपळूणच्या बाजारपेठेत पायी फिरत होते. व्यापाऱ्यांशी बोलत होते. पुरामुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगितल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, येथे नेहमीच पाऊस अत्याधिक होत असतो. पण यावेळी जो पाऊस झाला तो अनपेक्षित आहे. जीव वाचले आहेत हे महत्त्वाचं आहे. जे नुकसान झालंय, त्याचा अहवाल आम्ही मागितला आहे. आम्ही नुकसान भरपाईसाठी जे शक्य असेल ते करू.

लोकप्रियतेसाठी लगेच काही घोषणा करणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आणि पत्रकारांना म्हटले की, हवामानात अचानक बदल येणे सुरू झाले आहे. जलव्यवस्थापनाची एखादी निश्चित योजना आणावी लागेल. पावसाळ्यानंतर आलेल्या पुरामुळे चिपळूणच्या लोकांच्या खूप नुकसान झाले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची भरपाई केली जाईल. लोकप्रियतेसाठी मी लगेच काही घोषणा करणार नाही. लगेच घोषणा यामुळे करत नाहीये, कारण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि इतर जागांच्या नुकसानीचे अहवाल आल्यनंतर एकत्रच घोषणा करणे शक्य होईल. पण एवढा विश्वास ठेवा की, आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी व्यवस्थेशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. उद्या मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. सर्व पूरग्रस्त परिसराचा दौरा करूनच एखाद्या निर्णयावर येणार आहे. सध्या तातडीने जी मदत पोहोचवली जात आहे, तिची काळजी घेणे गरजेचे आहे.

CM Uddhav Thackeray visit flood affected Chiplun Maharashtra Women Crying In Front Of CM Thackeray Watch Video

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात