Maharashtra Unlock : पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (2 ऑगस्ट) सांगलीमध्ये आले आहेत. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरही संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना नियंत्रणात असलेल्या शहारांसाठी आणखी शिथिलीकरणाबाबत माहिती दिली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळता जेथे कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे तेथे आता व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामध्ये प्रमुख शहरांत आता दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत लवकरच अध्यादेश जारी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. CM Uddhav Thackeray On Maharashtra Unlock in Sangli Flood Affected Area visit Press Conference
विशेष प्रतिनिधी
सांगली : पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (2 ऑगस्ट) सांगलीमध्ये आले आहेत. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरही संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना नियंत्रणात असलेल्या शहारांसाठी आणखी शिथिलीकरणाबाबत माहिती दिली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळता जेथे कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे तेथे आता व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामध्ये प्रमुख शहरांत आता दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत लवकरच अध्यादेश जारी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद | सांगली – LIVE https://t.co/23KyFT7IQX — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद | सांगली – LIVE https://t.co/23KyFT7IQX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
दरम्यान, दुकानांच्या वेळांसोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना नियमावलीमधून हळूहळू शिथिलता मिळेल. यात ज्यातून आधी मोकळीक देण्यात येईल, त्यांचे परिणाम तपासून पुढचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यामुळे सर्वांसाठीच मुंबई लोकल सध्यातरी सुरू केली जाणार नाही, असेही सीएम ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील मुख्य शहरात असलेल्या कार्यालयांनाही मालकांनी वेळेचं बंधन घालून कर्मचार्यांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि ते शिफ्टमध्ये काम करू शकतील, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करू शकतील हे पाहावं असं आवाहन त्यांनी केले आहे. उद्योग धंद्यांच्या ठिकाणीदेखील बायोबाबलमध्ये कर्मचारी राहतील, असे पाहा म्हणजे आगामी कोरोना लाटेत पुन्हा उद्योगधंदे बंद पडणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवले.
दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यांना लवकरच कोरोना नियमांमधून शिथिलता मिळू शकते असे काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगूनही अद्यापही अधिसूचना मिळाली नसल्याने अनेक जण संभ्रमात होते. पण आज संध्याकाळपर्यंत हा संभ्रम दूर होण्याची आता स्थिती निर्माण झाली आहे. तथापि, नियमांमधून सूट मिळाली तरीही कोरोना मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच मास्क, हॅन्ड सॅन्टिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
CM Uddhav Thackeray On Maharashtra Unlock in Sangli Flood Affected Area visit Press Conference
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App