CM Uddhav Thackeray calls emergency meeting several areas in Ratnagiri Raigad submerged in water due to heavy rainfall

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-रायगडसह अनेक भाग जलमय, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक

CM Uddhav Thackeray calls emergency meeting : महाराष्ट्रात संततधार पावसामुळे अनेक शहरे व भागांत पूर आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण परिसरातील पुराचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अतिरिक्त बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यास सांगितले. CM Uddhav Thackeray calls emergency meeting several areas in Ratnagiri Raigad submerged in water due to heavy rainfall


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात संततधार पावसामुळे अनेक शहरे व भागांत पूर आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण परिसरातील पुराचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अतिरिक्त बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यास सांगितले.

संततधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग अर्धवट पाण्यात बुडाला आहे. बचाव कार्यासाठी येथे एनडीआरएफची आणखी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. एक पथक खेड, रत्नागिरी आणि दुसरे पुणे ते महाड, रायगड येथे तैनात करण्यात येणार असल्याचे एनडीआरएफकडून सांगण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेतली.

आपत्ती व्यवस्थापन घटकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी संवाद साधण्याबरोबरच तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी बोलून आपत्कालीन विभागाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यास सांगितले आहे. सीएमओच्या म्हणण्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित विभागांना सतर्क राहून बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

CM Uddhav Thackeray calls emergency meeting several areas in Ratnagiri Raigad submerged in water due to heavy rainfall

महत्त्वाच्या बातम्या