विशेष प्रतिनिधी
वरणगाव : लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरूद्ध आज महाराष्ट्र राज्यामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला बऱ्याच भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला होता आणि कडाडून टीका देखील केली होती.
Clashes between BJP and Maha vikas aaghadi people in Bhusawal
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे या बंदला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून बंद संदर्भात वेगवेगळा प्रचार केला जात होता. आणि अशा वेळी पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा आमोरा समोर आले त्यावेळी त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे असे वृत्त आहे.
धक्कादायक… ‘पीएम केअर’तून मिळालेल्या व्हेंटिलेटरसाठी मनुष्यबळ नसल्याने भुसावळमध्ये तिघांचा मृत्यू! कार्यक्षम म्हणविल्या जाणारे मंत्री राजेश टोपेंच्या खात्याची लक्तरे उघडी
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत. आता या हाणामारीमध्ये बरेच कार्यकर्ते जखमी देखील झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र शासनाने पुकारलेल्या बंदविरोधात बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या किरकोळ घटना घडलेल्या आहेत. पण हा बंद 100 टक्के यशस्वी आहे. लोकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे.’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App