धक्कादायक… ‘पीएम केअर’तून मिळालेल्या व्हेंटिलेटरसाठी मनुष्यबळ नसल्याने भुसावळमध्ये तिघांचा मृत्यू! कार्यक्षम म्हणविल्या जाणारे मंत्री राजेश टोपेंच्या खात्याची लक्तरे उघडी

कोरोनाच्या काळात कार्यक्षम मंत्री म्हणून नावाजलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या खात्याची लक्तरे समोर आली आहेत. व्हेंलिटलेटर उपलब्ध असूनही केवळ कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने भुसावळ येथे तीन जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पीएम केअर फंडातून हे दहा व्हेंटिलेटर मिळाले होते. Three killed in Bhusawal due to lack of manpower for ventilator from PM Care Fund


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या काळात कार्यक्षम मंत्री म्हणून नावाजलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या खात्याची लक्तरे समोर आली आहेत. व्हेंलिटलेटर उपलब्ध असूनही केवळ कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने भुसावळ येथे तीन जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पीएम केअर फंडातून हे दहा व्हेंटिलेटर मिळाले होते.

राज्यात कोरोनाची साथ सुरू झाल्याला वर्ष उलटले आहे. या काळात महाविकास आघाडी सरकारने आरोग्य सेवा सुधारण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, आरोग्याच्या सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे भुसावळमधील घटनेने उघड झाले आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हा दुदैर्वी प्रसंग ओढवला. तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी शथीर्चे प्रयत्न करूनही या रुग्णांचा जीव वाचवता आला नाही.

येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेट कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ ऑ क्सिजनची गरज असलेल्या कोरोना बाधितांना उपचारासाठी दाखल केले जाते.दाखल केलेल्या काही रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज पडते.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सात महिन्यांपासून पीएम केअर फंडातील १० व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असले तरी अद्याप त्यांचा वापर सुरू झालेला नाही. व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे अशक्य होत आहे. याच पद्धतीने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात गेल्या २४ तासात तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापैकी बोदवड तालुक्यातील रुग्ण बुधवारी, तर यावल व भुसावळ येथील प्रत्येकी एक असे दोघे गुरुवारी दगावले.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयास जुलै २०२० या महिन्यात पीएम केअर फंडातून १० व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरीदेखील व्हेंटिलेटर एका खोलीत बंद स्थितीत धूळ खात पडून आहे. एकीकडे व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचे जीव जात असताना दुसरीकडे आहे त्या व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Three killed in Bhusawal due to lack of manpower for ventilator from PM Care Fund

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*