वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे.Citizens relieved by rains in Mumbai; Cloudy weather in western Maharashtra, Marathwada
राज्यात तापमान वाढत असतानाच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आज सकाळीच मुबंई आणि पुणे शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय हवामान विभागातर्फे कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भात उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र आता पावसाची शक्यता असल्याने दिलासा मिळणार आहे. पण या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबईत काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मुंबईकरांच तारांबळ उडाली आहे. या व्यतिरीक्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रह्मपुरी, चंद्रपूर सर्वाधिक उष्ण
राज्यात उष्णतेचा दाह कायम असून बुधवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूर शहरांमध्ये कमाल तापमान ४५ अंशांवर होते. जगात सर्वाधिक तापमान या दोन शहरांत नोंदवले गेले आहे. तर, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया या शहरांमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App