मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश ; म्हणाले – राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा


मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात १०० % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश दिले आहे. Chief Minister Uddhav Thackeray gave instructions; Said – Get 100 percent vaccinated in the state by November 30


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोठ्या संख्येने दररोज कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. आता लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कोरोनाची लाट अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.



तसेच पुढे मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात १०० % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश दिले आहे. दरम्यान समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

तसेच पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की , कोविडचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.

Chief Minister Uddhav Thackeray gave instructions; Said – Get 100 percent vaccinated in the state by November 30

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात