वृत्तसंस्था
मुंबई : श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सव संपताच अनेकांनी मासांहारावर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली. एका अंड्याचा दर एक रुपयांनी वाढला आहेत. Chicken and eggs are expensive after shravan and ganeshotsav
श्रावण व गणेशोत्सवात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे मासळी किंवा मटणाच्या तुलनेत कोंबडी व अंड्याचे दर कमी असतात. त्यामुळे कोंबडी आणि अंड्याला मोठी मागणी असते.
श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात ब्रॉयलर कोंबडी १४० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी २३० रुपये प्रति किलोने आणि एक अंड पाच रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी १५० रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी २४० रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग सहा रुपये दराने विक्री केले जात आहे.
कोरोना आणि बर्ड फ्ल्यूच्या भीतीपोटी कोंबडीची मागणी घटली होती. अनेकांनी तर पोल्ट्री बंद केल्या. त्यामुळे महिन्यांपासून अंड्याची आवक कमी झाली आहे. आता मागणी वाढणार आहे. त्या तुलनेत कोबंडी आणि अंड्यांचा पुरेसा पुरवठा होणे अशक्य आहे. त्यामुळे कोंबडी, अंड्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App