शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता – चंद्रकांत पाटील


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका सुरु झाली आहे. या संदर्भात पाटील यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. Chandrakant Patil expressed his views on the allegations that he has insulted Sharad Pawar


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरुन महाआघाडीच्या नेत्यांनी पाटील यांच्यावर टीका सुरु केली. या संदर्भात पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, हा एकेरी उल्लेख अनावधानाने झाला होता. पवार यांचा अवमान करण्याची भूमिका त्यामागे अजिबात नव्हती.

पुण्यात पत्रकारांना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सांगलीच्या कार्यक्रमात माझ्याकडून झालेला एकेरी उल्लेख अनावधानाने झाला होता. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल अनादर कधीच नाही. आमचे काही बांधाला, बांध लागून काही भांडणही नाही.



किंबहुना अनेकदा त्यांची स्तुती करत असताना मी प्रमोद महाजन यांची आठवण सांगत असतो. महाजन यांनी आम्हाला सांगितले होते की, मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी चाळीस गोष्टी लिहून काढल्या. त्यातल्या 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही.

सांगलीच्या पक्ष कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील बोलून गेले होते की, राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण चोपन्न आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलेलं नाही. सगळ आयुष्य गेलं कधी साठच्या वर तो गेला नाही. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर पाटील यांच्यावर टीका सुरु झाली होती.

Chandrakant Patil expressed his views on the allegations that he has insulted Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात