प्रतिनिधी
पुणे : ठाकरे – पवार सरकारने आज दुपारी भोंगे या विषयावर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला गेले नव्हतेच पण त्या पलिकडे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या बैठकीची खिल्ली उडवली आहे. Chandrakant Dada blows the trumpet mocking the all-party meeting; Just tea – biscuits, no decision
ज्या बैठकीत काही निर्णय होणार नव्हता. नुसता चहा बिस्कीटे घ्यायला जाण्यात काय मतलब आहे?, असा सवाल करत चंद्रकांत दादांना बैठकीची खिल्ली उडवली. मुंबईचे आणि महाराष्ट्रातील सगळे निर्णय मातोश्रीवर ठरतात. सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे एकवटलेले आहेत. मुख्यमंत्री त्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहणार नव्हते. 50 वर्षांचे राजकारण असणारे आणि महाराष्ट्रात त्यांच्या शब्दाला वजन आहे
असे शरद पवार बैठकीत उपस्थित राहणार नव्हते. उपस्थिती फक्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची होती. पण त्यांना मुंबईतल्या आणि राज्यातल्या कुठल्याच निर्णयाचे अधिकार नाहीत. मग अशा बैठकीला जाऊन नुसते काय चहा-बिस्कीट घ्यायचे?, असा सवाल करून चंद्रकांत दादांनी द्या सर्वपक्षीय बैठकीचे खिल्ली उडवली.
सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांवर विशिष्ट मर्यादा घालण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे केंद्राने यासाठी सर्व देशभर एका विशिष्ट नियमावलीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. असे दिलीप वळसे पाटील यांनी सकाळच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App