पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त


अवैधरित्या पिस्टल विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्टलची तस्करी करुन त्याची महाराष्ट्रातील विविध शहरात विक्री करणाऱ्या टाेळीला अटक करण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे –अवैधरित्या पिस्टल विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्टलची तस्करी करुन त्याची महाराष्ट्रातील विविध शहरात विक्री करणाऱ्या टाेळीला अटक करण्यात पुणे पाेलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकास यश आले आहे. पाेलीसांनी याप्रकरणी चार आराेपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून साडेतीन लाख रुपये किंमतीचे ११ पिस्टल व १४ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे यांनी दिली आहे.Pune police crime branch arrested one illegal weapon sealing gang and recovered ११ pistal

याप्रकरणी मानेश्वर ऊर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय-२१,रा.शनिशिंगणापूर, अहमदनगर, मु.रा.अंतलवाली, ता.घाणसांगवी, जालना), निखिल बाळासाहेब पवार (२३,रा.लाेणीकाळभाेर,पुणे), युवराज बापू गुंड (२४,रा.वडकी, ता.हवेली,पुणे) व अमाेल नवनाथ तांबे (२७,रा.गाेटुंबे आखाडा, ता.राहूरी,नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.युनिट सहाच्या पाेलीस निरीक्षक गणेश माने यांना माहिती मिळाली हाेती की, अवैध पिस्टल विक्री करण्यास एक इसम वाघाेली परिसरातील केसनंद रस्ता याठिकाणी येणार आहे. त्यानुसारज्ञानेश्वर डुकरे यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता तीन पिस्टल व सहा काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे शस्त्रे बाळगण्याचा नेमका काय उद्देश हाेता,

सदर शस्त्रे काेठुन आणली, ती शस्त्रे काेणाला विक्री केली, त्याचे साथीदार काेण आदीबाबत पाेलीसांनी सखाेल तपास केला. त्यानंतर त्याचे तीन अन्य पिस्टल विक्री केलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडूनही शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर डुकरे याच्या शनिशिंगणापूर येथील घरातूनही तीन पिस्टल व काडतुसे जप्त करण्यात आली.

पिस्टल मागे दहा हजारांचा फायदा

आराेपी ज्ञानेश्वर डुकरे याच्या तपासात त्यास मध्यप्रदेशातील उज्जैन येतील शंकर नायर नावाचा व्यक्ती पिस्टल विक्री करत असल्याची बाब समाेर आली आहे. जळगाव जिल्हयातील रावेर येथून त्यांना पिस्टल ताब्यात मिळत हाेती. मध्यप्रदेश मधून १५ हजार रुपयात त्यांना पिस्टल मिळत असे आणि त्याची विक्री ते २५ हजार रुपयांपर्यं करत हाेते. ज्ञानेश्वर डुकरे हा शनिशिंगणापूर परिसरात मित्रांसाेबत भाडयाचे खाेलीत राहत हाेता व यापूर्वी ही त्याच्यावर दाेन गुन्हे दाखल आहे.

Pune police crime branch arrested one illegal weapon sealing gang and recovered ११ pistal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात