एकनाथ शिंदे बंड : 15 बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा महाराष्ट्रातील घरांभोवती सीआरपीएफचे जवान तैनात!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडात सहभागी झालेल्या आमदारांच्या कुटुंबियांना आणि घरांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. शिंदे गटातील 15 आमदारांच्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने ही सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यामध्ये आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच आमदार सदा सरवणकर, लता सोनवणे प्रताप सरनाईक आदींच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे.  Center provides security to 15 rebel MLAs CRPF personnel deployed around houses in Maharashtra

काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव  आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

आज संध्याकाळपर्यंत 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता बाकीचे आमदार कोण आहेत याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे. दादर भागात राहणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वैजापूरमध्ये सीआरपीएफ जवान दाखल झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे.

– कारस्थान भाजपचेच : सावंत

आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, आता या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

Center provides security to 15 rebel MLAs CRPF personnel deployed around houses in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात