दीड कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल, मुंबई पोलीस लवकरच चौकशी करणार


अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला आहे की, शिल्पा आणि राज यांनी 2014 पासून आतापर्यंत स्पा आणि जिमच्या फ्रँचायझी वाटण्याच्या नावाखाली अनेक वेळा फसवणूक केली आहे. नितीनने या प्रकरणात काशिफ खान, दर्शित शहा आणि त्याच्या काही साथीदारांवरही आरोप केले आहेत. Case Against Shilpa And Raj Kundra Allegation Of Cheating Of 1.5 Crores In The Name Of Distribution Of Gym And Spa Franchise


वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला आहे की, शिल्पा आणि राज यांनी 2014 पासून आतापर्यंत स्पा आणि जिमच्या फ्रँचायझी वाटण्याच्या नावाखाली अनेक वेळा फसवणूक केली आहे. नितीनने या प्रकरणात काशिफ खान, दर्शित शहा आणि त्याच्या काही साथीदारांवरही आरोप केले आहेत. मात्र, काशिफ आणि दर्शित कोण आहेत आणि शिल्पा-राजच्या कंपनीत त्यांची भूमिका काय आहे, हे कळू शकलेले नाही.

दीड कोटींची गुंतवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप

पोलीस तक्रारीनुसार, तक्रारदाराने पुण्यातील कोरेगाव येथे शिल्पा आणि राज यांच्या फर्म ‘M/s SFL प्रायव्हेट कंपनी’ची जिम आणि स्पा फ्रँचायझी उघडली होती. आरोपींनी त्याच्याकडे 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक करून नंतर त्या पैशांचा वैयक्तिक वापर केला. त्याने पैसे परत मागितले असता आरोपीने त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली.

शिल्पा आणि राज यांची लवकरच चौकशी

नितीनच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि इतर आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस लवकरच आरोपींची चौकशी करू शकतात. पोलीस लवकरच राज कुंद्रा आणि शिल्पा यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेऊ शकतात.

पॉर्न प्रकरणात राजला जामीन

पॉर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून तो कुठेच दिसला नाही. 1 नोव्हेंबर रोजी त्याने त्याचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटही डिलीट केले. पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला दोन महिन्यांनी 20 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. याप्रकरणी १९ जुलै रोजी राज कुंद्रा, रायन थोरपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली होती. राज यांच्यावर पॉर्न फिल्म्सचा व्यवसाय केल्याचा आरोप आहे.राजची पॉर्न कंपनीत 10 कोटींची गुंतवणूक

मुंबई क्राइम ब्रँचनुसार, राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीत 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राज आणि त्याच्या भावाने तिथे केनरिन नावाची कंपनी स्थापन केली. त्यानंतर पॉर्न व्हिडिओ भारतात शूट करून वी ट्रान्सफर (फाइल ट्रान्सफर सर्व्हिस) मार्फत केनरिन कंपनीला पाठवले गेले. ही कंपनी राज कुंद्राने स्थापन केली होती आणि भारताच्या सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी परदेशात नोंदणी केली होती.

Case Against Shilpa And Raj Kundra Allegation Of Cheating Of 1.5 Crores In The Name Of Distribution Of Gym And Spa Franchise

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण