दोन मिनीटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण…, खासदार संभाजीराजे यांचा इशारा


वृत्तसंस्था

पुणे: मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढचा मूक आंदोलन नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे. त् आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं सांगत दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायच नाही, असंही संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणाही संभाजीराजेंनी यावेळी केली आहे. Can light up Maharashtra in two minutes but MP Sambhaji Raje’s warning

यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायच नाहीय, असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं. वषार्नुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असेही संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितले.



आरक्षणासाठी आपल्याला केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे जावे लागणार आहे. आरक्षणाची मयार्दा वाढल्याशिवाय कोणत्याही समाजाला आरक्षण मिळणार नाही. ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जनगणना व्हायला हवी. त्यात प्रत्येकाचा कोटा ठरवा. १९६७ सालापर्यंत मराठा हा ओबीसीत होता. ५० टक्के अट जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत ते न्यायालयात टिकत नाही. जनगणना करा आणि १०० टक्के आरक्षण करा. त्यात मराठा समाजाला १३ नाही तर ३० टक्के आरक्षण मिळेल, असे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडले.

आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाजाला शिस्त आणि संयम पाळावा लागेल, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, सरकार चुकत असेल तर बोलावे लागेल, बरोबर असेल तर कौतुक करावे लागेल. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे लागेल. . मराठा समाज फॉरवर्ड, डोमीनेट वर्ग आहे, असे न्यायालयाने आरक्षण रद्द करताना मत मांडले आहे.

मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्यास तयार आहोत. नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्येही मूक आंदोलन करणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

Can light up Maharashtra in two minutes but MP Sambhaji Raje’s warning

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण