Breaking News : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन;मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी


मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.Anonymous phone call to Bandra Railway Police, threat of bomb blast in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलीरेल्वे पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून या निनावी फोन कॉलबाबत सध्या तपास सुरु आहे.या तपासानंतरच हा फेक कॉल होता का? याबाबत स्पष्टता येईल. मात्र, पोलिसांकडून मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.यापूर्वी देखील निनावी फोन

7 ऑगस्ट रोजीही एका निनावी फोन कॉलद्वारे सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती.

सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यावेळी शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला.

त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.

Breaking News: Anonymous phone call to Bandra Railway Police in Mumbai; Bomb threat in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण