बॉस १४ ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकला कोरोनाची लागण , ८ महिन्यात दुसऱ्यांदा झाला कोरोना

रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली होती याची माहिती दिली. Boss 14 winner and TV actress Rubina Dilaik contracted corona for the second time in 8 months


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेतून मोठमोठे राजकीय नेते तसेच बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटीही सुटलेले नाही.अशातच करोनाच्या या तिसऱ्या लाटेत बिग बॉस १४ ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली. मागच्या वर्षी मे महिन्यातही रुबीनाला करोनाची लागण झाली होती.

आता ८ महिन्यात पुन्हा एकदा रुबीनाला करोनाची लागण झाली आहे.रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली होती याची माहिती दिली. आता रुबीनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ती ठीक असल्याचंही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/CYn0FTypLXN/?utm_source=ig_web_copy_link

पोस्टमध्ये रुबिना म्हणाली की , ‘करोनाच्या तिसऱ्या लाटेनं माझ्या आरोग्यावर दुसऱ्यांदा आघात केला असला तरीही करोना अद्याप माझी हिंमत तोडू शकलेला नाही. त्यामुळेच मी आता माझं छोटं छोटं यश देखील सेलिब्रेट करते. यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर होतं. आता मी पूर्णपणे ठीक झाले आहे.’

Boss 14 winner and TV actress Rubina Dilaik contracted corona for the second time in 8 months

महत्त्वाच्या बातम्या