Dilip kumar Death : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी बुधवारी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते, त्यांना मुंबईतील रुग्णालयात अनेकदा दाखलही करण्यात आले होते. Bollywood tragedy King Dilip kumar Death in Hinduja Hospital Khar Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी बुधवारी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते, त्यांना मुंबईतील रुग्णालयात अनेकदा दाखलही करण्यात आले होते. बुधवारी बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने अंतिम श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली असून अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता मुंबईतील खार हिंदुजा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दिलीपकुमार यांच्या मृत्यूची खातरजमा करत असलेल्या रुग्णालयाच्या डॉ. पार्कर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1412600233062699008?s=20
गेल्या एका महिन्यात दिलीप कुमार यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 जुलै रोजी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट देण्यात आली. दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत आहे. ते अजूनही रुग्णालयात आहेत, त्यांना आपल्या प्रार्थनांची गरज आहे. पण या हेल्थ अपडेटनंतर दोनच दिवसांनी दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.
11 डिसेंबर 1922 रोजी ब्रिटीश अंमलाखालील भारतात पेशावर (आता पाकिस्तानात) येथे जन्मलेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. युसूफ खान यांनी नाशिकमध्ये शिक्षण घेतले. बालपणातच राज कपूर हे त्यांचे मित्र झाले. जणू तिथूनच दिलीप कुमार यांचा बॉलीवूडमध्ये प्रवास सुरू झाला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट आला. 1944 मध्ये त्यांनी ‘ज्वार भाटा’ चित्रपटात काम केले, परंतु त्यांच्या या चित्रपटाची जास्त चर्चा झाली नाही.
दिलीप कुमार यांनी करियरमध्ये जवळपास पाच दशकांदरम्यान सुमारे 60 चित्रपट केले. दिलीपकुमार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांना नाकारले होते, कारण दिलीप कुमारांचा असा विश्वास होता की चित्रपट कमी असले तरी चांगले असावेत. पण दिलीपकुमार यांनाही कायम खंत राहिली की, ते प्यासा आणि दिवारमध्ये काम करू शकले नव्हते.
दिलीपकुमार यांनी 1966 मध्ये सायरा बानोंशी लग्न केले होते. सायरा बानो दिलीप कुमार यांच्यापेक्षा 22 वर्षांची लहान होत्या. दिलीप कुमार यांनी आसमा साहिबाशीही लग्न केले होते, हे लग्न फक्त 1983 पर्यंत चालले होते. पण सायरा बानो यांनी मात्र अखेरच्या श्वासापर्यंत दिलीपकुमार यांना साथ दिली. सायरा बानो सातत्याने दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती देत होत्या.
ज्वार भाटापासून सुरू झालेल्या दिलीप कुमार यांचे संस्मरणीय चित्रपट शहीद, मेला, नदिया के पार, बाबुल, फुटपाथ, देवदास, नया दौर, मुघल-ए-आझम, गंगा-जमुना, राम और श्याम, कर्मा, सौदागर हे होते. दिलीप कुमार यांचा अखेरचा चित्रपट 1998 मध्ये आला होता.
Bollywood tragedy King Dilip kumar Death in Hinduja Hospital Khar Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App