विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्ती अग्रवाल यांनी दोन वर्षांमध्ये तब्बल 36 मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील सूत्रांनी दिली आहे. BMC Yashwant Jadhav Properties: “Power” of Yashwant Jadhav and colleagues; Purchase of 36 properties in just 2 years !!
शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या ₹१००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे ED इ डी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग…द्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 20, 2022
शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या
₹१००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे
ED इ डी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग…द्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 20, 2022
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी नुकतीच यशवंत जाधव आणि त्यांच्या शी संबंधित कंत्राटदारांच्या तब्बल 35 मालमत्तांवर छापे घातले होते. त्यासंबंधीची कागदपत्रे त्यांनी मिळवली आहेत आणि यातून एक धक्कादायक खुलासा झाला असून यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्ती अग्रवाल यांनी अवघ्या 2 वर्षात तब्बल 36 मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. झी 24 तास आणि एबीपी माझा या वाहिन्यांकडे त्यासंबंधीची कागदपत्रे असल्याची बातमी त्यांनी दिली आहे.
यशवंत जाधव आणि त्यांचा निकटवर्तीय अग्रवाल यांनी खरेदी केलेल्या सर्व मालमत्ता मुंबईत आणि परिसरातील आहेत. 36 मालमत्तांचा खरेदी व्यवहार हे गेल्या 2 वर्षांत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App