BJP MUMBAI : मुख्यमंत्री मुंबईचा मात्र मुंबईचे स्वप्न भंग! भाजप मुंबई मुंबईचा हक्क मिळवून देणार ; फक्त मुंबईच्या विकासाचा संकल्प….


भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली असून कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ठाकरे-पवार सरकार बद्दल खंत व्यक्त करण्यात आली आहे. BJP MUMBAI: Chief Minister Mumbai’s dream of Mumbai is shattered! BJP will get the right to Mumbai Mumbai; Only the resolution for the development of Mumbai ….


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यामुळे मुंबईला या सरकारकडून खूप आशा होती परंतु मुंबईकरांच्या सर्व आशा व स्वप्नांचा चक्काचूर करण्याचे काम हे मुख्यमंत्र्यांनी केले आहे.’ अशा शब्दात भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खंत व्यक्त केली आहे. भाजप कार्यकारिणीची शुक्रवार (12 नोव्हेंबर) मुंबईतील दादर येथे बैठक पार पडली. ज्यामध्ये एक राजकीय प्रस्ताव संमत करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी हा संकल्प करते की, येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही पक्षाची सत्ता आणण्यासाठी किंवा कोणत्याही पक्षाचा महापौर करण्याची लढाई नाही परंतु ही मुंबईच्या हक्काची व न्यायाची लढाई आहे आणि मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्याची लढाई आहे.

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतील राजकीय प्रस्ताव

गेल्या 25 वर्षामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून मुंबई शहराला आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम हे मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केलेले आहे.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबई शहरांच्या रस्त्यांमध्ये असलेल्या खड्यांवरुन गदारोळ.

24 वर्षामध्ये 21,000 कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करुनही मुंबई शहराचे रस्ते हे देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये खड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध .

मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून मुंबई शहराला 25 वर्षामध्ये साधे चांगले रस्तेही मिळाले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणे याची सवय जणू काही मुंबईकरांना झालेलीच आहे.गेल्या 10 वर्षांमध्ये विविध नाला वायडनिंग व पंपिग स्टेशनच्या प्रकल्पावर 7 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करुनही मुंबईची तुंबई होते.

दरवर्षी नालेसफाईमध्ये महापालिका 100 कोटी पेक्षा जास्त पैसे हे खर्च करीत असते. परंतु मुंबईकरांचे 8 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे हे नाल्यामध्ये बुडून गेल्याचे चित्र .

कचरा, शाळा, इस्पितळ इ. अनेक विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार .

‘या देशामध्ये 2जी, 3जी, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ सारखे अनेक भ्रष्टाचार झालेले असून आमचा हा दावा आहे की, स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये घडलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेमध्ये घडलेला भ्रष्टाचार आहे.

सुमारे 3 लाख कोटी पेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महापालिकेमध्ये झालेला आहे.

2014 ते 2019 कालवधीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मुंबईचे प्रलंबित असलेले मेट्रो, वरळी ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतल सारखे अनेक प्रकल्प हे रेकॉर्ड वेळेमध्ये मार्गी लावले. पण वरील नमूज केलेल्या सर्व प्रकल्पांचा बट्याबोळ करण्याचे काम हे गेल्या 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारने केले.

खरंतर मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यामुळे मुंबईला या सरकारकडून खूप आशा होती परंतु मुंबईकरांच्या सर्व आशा व स्वप्नांचा चक्काचूर करण्याचे काम हे मुख्यमंत्र्यांनी केले.

भाजप मुंबई ही मुंबईच्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकरांचा विकास करण्यासाठी व मुंबईला आपले नाव लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचा व हे युद्ध जिंकण्याचा संकल्प करेत.

दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणे याची सवय जणू काही मुंबईकरांना झालेलीच आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये विविध नाला वायडनिंग व पंपिग स्टेशनच्या प्रकल्पावर 7 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करुनही मुंबईची तुंबई ही दर पावसामध्ये झालेली दिसून येते.

दरवर्षी नालेसफाईमध्ये महापालिका 100 कोटी पेक्षा जास्त पैसे हे खर्च करीत असते. परंतु मुंबईकरांचे 8 हजार कोटी पेक्षा जास्त पैसे हे नाल्यामध्ये बुडून गेल्याचे चित्र हे मुंबई शहरासमोर दिसून येत आहे. परंतु कचरा, शाळा, इस्पितळ इ. अनेक विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार झालेला दिसून येतो.

‘या देशामध्ये 2जी, 3जी, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ सारखे अनेक भ्रष्टाचार झालेले असून आमचा हा दावा आहे की, स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये घडलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेमध्ये घडलेला भ्रष्टाचार आहे. सुमारे 3 लाख कोटी पेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महापालिकेमध्ये झालेला आहे.’

2014 ते 2019 कालवधीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मुंबईचे प्रलंबित असलेले मेट्रो, वरळी ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतल सारखे अनेक प्रकल्प हे रेकॉर्ड वेळेमध्ये मार्गी लावले. पण वरील नमूज केलेल्या सर्व प्रकल्पांचा बट्याबोळ करण्याचे काम हे गेल्या 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारने केले.

खरंतर मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यामुळे मुंबईला या सरकारकडून खूप आशा होती परंतु मुंबईकरांच्या सर्व आशा व स्वप्नांचा चक्काचूर करण्याचे काम हे मुख्यमंत्र्यांनी केले.

भाजप मुंबई ही मुंबईच्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकरांचा विकास करण्यासाठी व मुंबईला आपले नाव लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचा व हे युद्ध जिंकण्याचा संकल्प करते.

BJP MUMBAI : Chief Minister Mumbai’s dream of Mumbai is shattered! BJP will get the right to Mumbai Mumbai; Only the resolution for the development of Mumbai ….

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण