विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळच्या वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक तयार झाले आहे.पुर्वी हबीबगंज असे नाव असलेल्या या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील नागरिकांनी यासाठी प्रयत्न केले त्यानंतर शिवराज सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.त्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आता हे स्थानक राणी कमलापती रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
सध्या रेल्वे स्थानकाचे नाव हबीबगंज रेल्वे स्थानक असून ते बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक करण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे. हे पत्र मध्य प्रदेशच्या परिवहन विभागाने केंद्र सरकारला लिहिले. 15 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या वर्ड क्लास रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत.
हे स्टेशन 450 कोटी खर्चून तयार करण्यात आले आहे. हे देशातील पहिले स्थानक ठरले आहे जेथे प्रवाशांना विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळू शकतात. या स्थानकावर लोकांना गर्दी न होता ट्रेनच्या बर्थपर्यंत पोहोचता येणार आहे. जे प्रवासी स्थानकावर उतरतील ते थेट स्थानकाबाहेर दोन वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतील..
देशभरात १५ नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जात असल्याने भोपाळ संस्थानातील राणी कमलापती यांच्या नावाचाही विचार करण्यात आला.
ज्यावर जवळपास सर्वांचेच एकमत झाले. त्यानंतरच राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला. 16 व्या शतकात भोपाळ हे गोंड शासकांच्या अधिपत्याखाली होते असा उल्लेख प्रस्तावात आहे. गोंड राजा सूरज सिंह शाह यांचा मुलगा निजाम शाहचा विवाह राणी कमलापतीशी झाला होता.
राणीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत आक्रमकांना धैर्याने तोंड दिले. गोंड राणीच्या स्मृती अबाधित ठेवण्यासाठी आणि तिच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, राज्य सरकारने 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त हबीबगंज स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App