सेना – भाजप युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा होऊ शकते, खा. गिरीश बापट यांचा विश्वास

BJP MP Girish Bapat says shiv sena BJP Alliance will be on Hindutwa

shiv sena BJP Alliance :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने भाजपसोबत जुळवून घेत पुन्हा युती करण्याची विनंती त्यांनी केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धारण केला आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले. BJP MP Girish Bapat says shiv sena BJP Alliance will be on Hindutwa


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने भाजपसोबत जुळवून घेत पुन्हा युती करण्याची विनंती त्यांनी केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धारण केला आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले.

खा. बापट म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. महापालिकेत शिवसेना-भाजप युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही ते म्हणाले.

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले. भविष्यात युती होऊ शकते. राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असंही बापट यावेळी म्हणाले.

BJP MP Girish Bapat says shiv sena BJP Alliance will be on Hindutwa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण