‘’…म्हणून ‘गिरा तो भी टांग उपर’ ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचे धोरण’’ आशिष शेलारांनी साधला निशाणा!

Uddhav Thakray and Shelar

‘’उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं जे आता सुरू आहे ते सत्तासरपटूपणा आहे.’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील  सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निर्णय दिला. त्यानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडताना, अपेक्षेप्रमाणे राज्यपाल आणि शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर आता भाजपाकडून पलटवार करण्यात आला आहे. BJP MLA Ashish Shelar criticized Uddhav Thackeray

भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘’नैतिकतेची केलेली ढाल याचा अर्थ महाराष्ट्राने पूर्वी एक शब्द  पाहिलेला आहे. सत्तापिपासूनपणा पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं जे आता सुरू आहे ते सत्तापिपासूपणा नसून सत्तासरपटूपणा आहे. सत्तेसाठी सरपटणे आहे. नवीन शब्द उद्धव ठाकरेंच्या पक्षाने महाराष्ट्राला दिला आहे, तो म्हणजे सत्तासरपटणे.’’

याचबरोबर ‘’सवाल कितपत खरे आहेत, तुम्ही न्यायालयात कशासाठी गेला होता? हे सरकार अवैध घोषित करण्यासाठी गेला होतात, करू शकलात का? नाही. तुम्ही न्यायालयात गेला होता १६ आमदरांना अपात्र करण्यासाठी, आमदारांना अपात्र करू शकलात का? नाही. तुम्ही न्यायालयात गेला होता,  विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवण्यासाठी, तुम्ही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकलात  का? नाही. तुम्ही न्यायालयात गेला होता की राज्यपालांची भूमिका चुकीची होती,  ती बदलली पाहिजे  ही मागणी करण्यासाठी मग तुम्ही राज्यपालांचा निर्णय फिरवू शकलात का? नाही. तुम्ही  न्यायालयात गेला होता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवा हा निवडा मागण्यासाठी, तुम्हाला सत्तेत बसवण्याचा  निवडा आला का? नाही. तुम्हाला  एकनाथ  शिंदेंना अवैध मुख्यमंत्री ठरवायचं होतं, म्हणून तुम्ही न्यायालयात गेलात, मग तुम्ही शिंदे सरकारला अवैध ठरवू शकलात का? नाही.’’ असंही शेलार यांनी यावेळी म्हटले.

याशिवाय ‘’त्यामुळे सर्व प्रश्न आणि तुम्ही केलेली मागणी व न्यायालयाकडून मिळालेलं उत्तर हे नकारात्मक असल्याने, तुमचा सत्तासरपटूपणा आता इथपर्यंत गेला, की ‘गिरा तो भी टांग उपर’. म्हणून  ‘गिरा तो भी टांग उपर’ ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचे धोरण! ‘’ असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

BJP MLA Ashish Shelar criticized Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात