भाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार

BJP Leader chandrakant BawanKule Criticized Thackeray Govt

BJP Leader chandrakant BawanKule : भाजपचं ठरलंय, लढाई 51 टक्क्यांची, महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करायची!!; अशा शब्दांत भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एल्गार पुकारला. BJP Leader chandrakant BawanKule Criticized Thackeray Govt


प्रतिनिधी

मुंबई : भाजपचं ठरलंय, लढाई 51 टक्क्यांची, महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करायची!!; अशा शब्दांत भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एल्गार पुकारला.

चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर संकल्प यात्रा काढून 25 लाख युवकांना जोडण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.

राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण व्हायला आली असून, अजूनही सरकार अस्थिर होताना भाजपला दिसत नाही. त्यातच आता पुन्हा एकदा सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले असून, यातूनच महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करायची, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही ठरवलेय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीची रिक्षा पंक्चर करायची, असे बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपची संकल्प यात्रा

ठाकरे – पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने 4 मार्चला सांगितले होते की, राज्य सरकारने डेटा तयार करावा. मात्र सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितले होते यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.

तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू झाले आहे. हे सरकार मुघलांसारखे वागत आहे. युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली आणि 12 तास आधी रद्द केली, हा सर्वच सावळागोंधळ सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर मुख्यमंत्री वांद्र्यापुरते आणि मंत्री गावापूरते राहिल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे.

BJP Leader chandrakant BawanKule Criticized Thackeray Govt

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण