OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाच्या परत मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक होत राज्यभरात चक्काजाम व जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरातील भाजप नेते, कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, नागपूर अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणीही ओबीसी आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलने झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. BJP Agitations In All Districts For OBC Reservation Issue, Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde Arrested By Police
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाच्या परत मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक होत राज्यभरात चक्काजाम व जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरातील भाजप नेते, कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, नागपूर अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणीही ओबीसी आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलने झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला.#OBCvirodhiMVA pic.twitter.com/49mqyth4Kp — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 26, 2021
एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला.#OBCvirodhiMVA pic.twitter.com/49mqyth4Kp
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 26, 2021
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी मोठं आंदोलन झालं. आंदोलनस्थळी फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण कसं रद्द झालं, यावर प्रकाश टाकला. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण गेल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी कोल्हापूर मध्ये शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन सुरू असताना पोलिसांनी दमन नितीचा वापर करत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना अटक केली https://t.co/v6y1wzE2C5 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 26, 2021
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी कोल्हापूर मध्ये शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन सुरू असताना पोलिसांनी दमन नितीचा वापर करत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना अटक केली https://t.co/v6y1wzE2C5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 26, 2021
अवघ्या राज्यात आंदोलन सुरू आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढणार. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार डेटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा चंद्रकांतदादांनी घेतला. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं होतं.
लढा ओबीसींचा संघर्ष भाजपाचा #OBCvirodhiMVA https://t.co/IipeRLvMMR — BJP Mumbai (@BJP4Mumbai) June 26, 2021
लढा ओबीसींचा संघर्ष भाजपाचा #OBCvirodhiMVA https://t.co/IipeRLvMMR
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) June 26, 2021
मुंबईत भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चक्का जाम आंदोलन केले. ओबीसी आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी रस्ते दणाणून गेले होते. महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.
#OBCVirodhiMVA https://t.co/rMVkws1tLq — BJP Pune (@BJP4PuneCity) June 26, 2021
#OBCVirodhiMVA https://t.co/rMVkws1tLq
— BJP Pune (@BJP4PuneCity) June 26, 2021
राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असताना पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने गोलगोल फिरवलं, कोणताही डाटा जमा केला नाही.आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असंही त्या म्हणाल्या. मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
BJP Agitations In All Districts For OBC Reservation Issue, Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde Arrested By Police
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App