वीज वापरल्याने थकीत बिले भरावीच लागतील; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा इशारा


वृत्तसंस्था

अकोला : कोरोनाच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणेने जनतेला अखंडित वीज पुरवठा केला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले. पण जर वीज वापरली असेल तर देयकाचे पैसे भरावेच लागेल,” असा इशारा वीज ग्राहकांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला. bills will have to be paid for using electricity; Energy Minister Nitin Raut Warning

अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.राज्यभरात शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्यावरून तीव्र आंदोलने सुरू असताना ऊर्जामंत्री यांचे वक्तव्य हे आंदोलन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश असल्याचे मानले जात आहे. यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे.

”ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.

bills will have to be paid for using electricity; Energy Minister Nitin Raut Warning

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती