बांगलादेश सरकारशी द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर चर्चा हवीच; संघाची आग्रही भूमिका


प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी द्विपक्षीय चर्चा करताना तिथल्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केलाच पाहिजे, अशा स्वरूपाचा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. हे एक प्रकारे केंद्र सरकारला संघाने हे आदेश दिल्याचे मानण्यात येत आहे.Bilateral negotiations with the Bangladesh government should discuss the issue of atrocities against Hindus; The insistent role of the team

अखिल विश्वातील हिंदूंची मातृसंघटना म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पुढाकार घेतला आहे. तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावेत, यासाठी आता भारताने थेट बांगलादेशाला दमात घ्यावे, असा ठराव संघाच्या बैठकीत संमत झाला.



काय भूमिका आहे संघाची? 

नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात बांगलादेशात हिंदूंवर खोटेनाटे आरोप लावून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. हे सर्व हल्ले सुनियोजित पद्धतीने करण्यात येत होते, अशा रीतीने येथे हिंदू असुरक्षित बनले आहेत. त्यामुळे हिंदूंवरील हल्लेखोरांविरोधात बांगलादेशी सरकारने कठोर कारवाई करावी आणि हे हल्ले थांबवावेत.

बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाला नष्ट करण्याचा हा तेथील धर्माधांचा कुटील डाव आहे. हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने द्विपक्षीय चर्चेच्या सर्व मार्गाचा अवलंब करावा, असा प्रस्ताव संघाच्या बैठकीत चर्चिला गेल्याची माहिती संघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असताना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तीन दिवसीय बैठकीचे आयोजन 

धारवाड येथे संघाची ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’ची तीनदिवसीय बैठक गुरुवारी सुरू झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सर्व सहकार्यवाह तसेच, प्रांतसंघचालक, कार्यवाह प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघ परिवारातील संघटनांचे सचिव असे एकूण साडेतीनशे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित आहेत. २०२५ मध्ये संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तीन वर्षांचा विस्तार कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्याचाही सविस्तर आराखडा या बैठकीत निश्चित केला जाणार आहे.

Bilateral negotiations with the Bangladesh government should discuss the issue of atrocities against Hindus; The insistent role of the team

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात