13 वर्षांच्या काश्मिरी मुलीने रचला इतिहास, दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपदासह भारताचा केला नावलौकिक


13 वर्षीय तजमुल इस्लामने किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोराच्या तमजुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या 14 वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात तिने अर्जेंटिनाच्या ललिनाचा पराभव करण्यापूर्वी यजमान देशाच्या दोन दिग्गज बॉक्सर्सचा पराभव केला. Kashmir Tajamul Islam Clinches Gold In World Kickboxing Champion For 2nd Time


वृत्तसंस्था

श्रीनगर : 13 वर्षीय तजमुल इस्लामने किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोराच्या तमजुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या 14 वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात तिने अर्जेंटिनाच्या ललिनाचा पराभव करण्यापूर्वी यजमान देशाच्या दोन दिग्गज बॉक्सर्सचा पराभव केला.

विजयानंतर तजमुलने ट्विट करून आनंद व्यक्त केला. तिने लिहिले, ‘माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले. आता मी दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले आहे.’ याआधी 2016 मध्ये वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी किकबॉक्सिंगमध्ये तिने पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन होती.



तजमुलने दुसऱ्यांदा यश मिळवले

चॅम्पियनशिपबद्दल बोलताना, बांदीपोरा येथील आर्मी स्कूलमध्ये शिकलेल्या तजमुलने TOI ला सांगितले, “चॅम्पियनशिप 18 ऑक्टोबरला सुरू झाली आणि 24 ऑक्टोबरला संपली, मी 22 ऑक्टोबरला माझा अंतिम सामना खेळला. या जागतिक स्पर्धेत भारतातून 30 खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारात भाग घेतला .तजमुलच्या या यशाबद्दल जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Kashmir Tajamul Islam Clinches Gold In World Kickboxing Champion For 2nd Time

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात