१४ ते २१ नोव्हेंबर या कालावधित ह.भ.प.डाॅ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या नियोजनाखाली भक्ती पंढरी सोहळा सुरू आहे.Bhumi Pujan of Vitthal-Rukmini temple restoration work in Nilobaraya’s palace will be held by Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
पारनेर : रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी संत निळोबाराय महाराज अभंग गाथा प्रकाशन सोहळा आणि निळोबारायांच्या वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते होईल.यावेळी ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, चैतन्य महाराज देगलूकर आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान संत निळोबाराय महाराजांच्या दिंडीला १२५ वर्षांची परंपरा आहे.तसेच पंढरपूर येथील आषाढी वारीत राज्यातील मानाच्या दिंड्यांमध्ये ९ वे स्थान आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधित ह.भ.प.डाॅ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या नियोजनाखाली भक्ती पंढरी सोहळा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App