भारताच्या चांद्रयानाची अवकाशात नासाच्या यानाशी होणारी टक्कर टळली


वृत्तसंस्था

बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती इस्रोने दिली. २० ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ हा अंतराळातील अपघात टळला. Chandryan Accident aveled in space

या घटनेपूर्वी आठवडाभर आधी इस्रो व अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने यासंदर्भात विश्वेषण केले. त्यानुसार, दोन्ही यानांच्या प्रतलातील अंतर १०० मीटरपेक्षाही कमी होणार असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्याचप्रमाणे, या यानांमधील प्रत्यक्षातील सर्वाधिक जवळचे अंतर तीन कि.मी.पेक्षाही कमी असेल, हेही लक्षात आले. इस्रो व नासाने ही संभाव्य टक्कर टाळण्यासाठी उपाय (सीएएम) वापरण्याचे ठरविले.त्यानुसार, १८ ऑक्टोबरला अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजून २२ मिनिटांनी सीएएमची अमलबजावणी करण्यात आली. इस्रोने टक्कर टाळण्यासाठी ‘चांद्रयान २’ च्या ध्रवीय कक्षेत बदल करण्यात आला. ही दोन्ही याने साधारणत: एकाच ध्रुवीय कक्षेत चंद्राची परिक्रमा करतात. त्यामुळे, चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर ते एकमेकांजवळ येतात. चांद्रयान गेल्या दोन वर्षांपासून चंद्राची परिक्रमा करत आहे.

Chandryan Accident aveled in space

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात