प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही आमच्यामागे ED लावली तर आम्ही तुमची CD लावू, अशी धमकीवजा भाषा वापरणाऱ्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ED ने आज अटक केली. ज्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता, त्याच घोटाळ्याच्या प्रकरणात खडसेंच्या ED ने अटक केली आहे. पण हे अटक प्रकरण एवढ्यावरच थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. Bhosari MIDC plot fraud; Eknath khadse and mandakini khadse may face ED areest
खडसे यांच्या विरोधात भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी कायदेशीर लढा देणाऱ्या ऍड. असीम सरोदे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या हवाल्याने टीव्ही ९ ने ही बातमी दिली आहे. जावयांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे, असे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील न्यायालयात असीम सरोदे हे एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही केस लढवत आहेत. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रे आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं मतही अॅड. सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
असा हा भूखंड घोटाळा
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहीत केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आले होते.
म्हणजे या प्रकरणात एकटे जावईच खरेदीदार नाहीत, तर मंदाकिनी खडसे याही खरेदीदार आहेत, हे उघड झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App