भिवंडी : खंडूपाडा परिसरात अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग,आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली ; जिवित हानी नाही


 

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या.अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.Bhiwandi: 20 to 25 two-wheelers caught fire in Ansari Marriage Hall in Khandupada area; No loss of life


विशेष प्रतिनिधी

भिवंडी : भिवंडीतील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉलला काल रात्री दहा वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या.अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.

नेमकी घटना काय घडली?

रविवारी भिवंडीतील अंसारी या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते.या फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. यावेळी सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

Bhiwandi: 20 to 25 two-wheelers caught fire in Ansari Marriage Hall in Khandupada area; No loss of life

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण